Home गुन्हे Tathawade Crime News :ताथवड्यात वाहतूक पोलिसावर कात्रीने हल्ला; आरोपी फरार

Tathawade Crime News :ताथवड्यात वाहतूक पोलिसावर कात्रीने हल्ला; आरोपी फरार

ताथवडे येथे वाहतूक नियमांवर कारवाई केल्याच्या रागातून तरुणाने पोलिसावर कात्रीने हल्ला केला. जखमी पोलिसावर उपचार सुरू असून आरोपी फरार आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई केल्याच्या रागातून एका तरुणाने वाहतूक पोलिसावर कात्रीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताथवडे येथील भुयारी मार्गाजवळ घडली. ही घटना बुधवारी (२५ मार्च) सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास उघडकीस (Tathawade Crime News) आली.

 

या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस कर्मचारी अब्दुल मोहम्मद अन्सारी (वय ४०) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हार्दिक सुपेकर (वय २८, रा. ताथवडे) असे आरोपीचे नाव असून तो हल्ल्यानंतर फरार झाला (Tathawade Crime News) आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत असताना अन्सारी यांनी त्याला अडवून समज दिली होती. त्याचाच राग मनात ठेवून आरोपीने हा हल्ला केल्याचे समोर आले (Tathawade Crime News)आहे.

 

घटनेच्या वेळी अन्सारी हे ताथवडे भुयारी मार्गाजवळ वाहतूक नियंत्रण करत होते. त्याच वेळी आरोपीने मागून येत अचानक कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात अन्सारी यांच्या डाव्या कानाजवळ व हाताच्या कोपराजवळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात(Tathawade Crime News) आले.

 

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलिस करत (Tathawade Crime News)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00