Home गुन्हे शेजारील वादातून तरुणावर दगडाने हल्ला; आरोपी फरार

शेजारील वादातून तरुणावर दगडाने हल्ला; आरोपी फरार

PCMC Crime News:पिंपरीतील बौद्धनगर परिसरात शेजाऱ्यांमधील वादातून २७ वर्षीय तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १८ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १० जून : पिंपरीतील बौद्धनगर परिसरात शेजाऱ्यांमधील वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १८ वर्षीय तरुणाविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

याबाबत शाहिद तैमुर शेख (वय २७, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जल्ला उर्फ मेहताब शेख (वय १८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता बौद्धनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आरोपीने शाहिद शेख आणि त्यांचा भाऊ साहिल यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, आरोपीने दगडाने हल्ला करून शाहिद शेख यांच्या डोक्याला व खांद्याला दुखापत केली. तसेच पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00