Home क्रीडा Manav Shinde Shoto :टीम अपेक्स गेमिंग ची दमदार सुरुवात; मानव शिंदेच्या खेळीची जगभर चर्चा

Manav Shinde Shoto :टीम अपेक्स गेमिंग ची दमदार सुरुवात; मानव शिंदेच्या खेळीची जगभर चर्चा

Free Fire Esports World Cup 2026 मध्ये Team Apex Gaming ने पहिल्या दिवशी ४३ गुणांसह दमदार सुरुवात केली. मानव शिंदे (TAG Shoto) यांच्या शानदार कामगिरीची जगभर चर्चा होत असून भारताच्या S8UL आणि Total Gaming कडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

by Admin
Spread the love

(पॅरिस | प्रतिनिधी):Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Team Apex Gaming ने ग्रुप स्टेजच्या पहिल्या दिवशी झुंजार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सहा सामने पूर्ण झाल्यानंतर Team Apex Gaming ने ४३ गुणांसह गुणतालिकेत दहावे स्थान मिळवले असून स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम (Manav Shinde Shoto )आहे.

Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Team Apex Gaming चे आव्हान अद्याप कायम आहे. पहिल्या दिवसाअखेर संघाने सहा सामने पूर्ण केले असून ४३ गुणांची कमाई केली आहे. अधिकृत गुणतालिकेनुसार Team Apex Gaming सध्या नवव्या स्थानावर आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक गटातील संघ १२ सामने खेळणार आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी सहा सामने पूर्ण झाले असून उर्वरित सहा सामने गुरुवार (१६ जुलै) रोजी खेळवले जाणार आहेत. या सामन्यांनंतर अंतिम गुणतालिका निश्चित होणार आहे.

ग्रुप स्टेजमधील अव्वल चार संघांना थेट ग्रँड फिनालेचे तिकीट मिळणार आहे. तर पाचव्या ते दहाव्या क्रमांकावरील संघांना ‘सर्व्हायव्हल स्टेज’मध्ये आणखी एक संधी मिळेल. त्यामुळे Team Apex Gaming साठी दुसऱ्या दिवसातील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, Team Apex Gaming कडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडू मानव शिंदे (TAG Shoto) याच्या खेळाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक ई-स्पोर्ट्स पेजेस आणि चाहत्यांनी त्याच्या आक्रमक खेळाचे कौतुक केले आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक कामगिरीबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्व आकडेवारीची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने ती येथे नमूद करण्यात आलेली नाही.

गुरुवार, १६ जुलै रोजी दुपारी Group B मधील भारताचे S8UL Esports आणि Total Gaming Esports यांचेही सामने सुरू होणार आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांचे लक्ष आता या तिन्ही संघांच्या कामगिरीकडे लागले आहे. भारतातील एखादा संघ थेट ग्रँड फिनाले गाठतो का, याकडे ई-स्पोर्ट्स विश्वाचेही लक्ष असेल.

भारताच्या तिन्ही संघांकडून जागतिक स्तरावर दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून, पुढील सामने भारतीय ई-स्पोर्ट्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार (Manav Shinde Shoto )आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00