Home आरोग्य Akurdi Blood Donation: १२६ नागरिकांचे रक्तदान; विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

Akurdi Blood Donation: १२६ नागरिकांचे रक्तदान; विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

आकुर्डीत कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान स्पर्धेत १२६ नागरिकांनी रक्तदान केले. भैरवनाथ मित्र मंडळ प्रथम.

by Admin
Spread the love

(आकुर्डी ): कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक आणि विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात १२६ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

 

मंडळांच्या रक्तदानातील सहभागाच्या आधारे भैरवनाथ मित्र मंडळ, आकुर्डी गावने प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तेज मित्र मंडळ, दत्तवाडीने द्वितीय क्रमांकाचे १५ हजार, तर जगदंब प्रतिष्ठानने तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.

 

रक्तदात्यांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये आकुर्डीचे रितेश गायकवाड यांनी एक ग्रॅम सोन्याचे नाणे, तर ताथवडेचे मयूर पवार यांनी सायकल जिंकली. उपक्रमासाठी संजीवनी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

 

कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रसाद शेट्टी, उद्योजक अमित बाबर, आयुष निंबारकर, पायल ज्वेलर्स दत्तवाडी आणि स्काय ब्लू हॉटेल यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले.

 

यावेळी उद्योजक उमेशभाऊ चांदगुडे, नगरसेवक प्रसाद शेट्टी, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका शैलजाताई मोरे, उद्योजक अमित बाबर, कुणाल लांडगे, बाबूभाई शेट्टी, रणजित सोलंकी, जालिंदर काळभोर, महेश काटे, नानासाहेब पिसाळ, नितीन काकडे, टाटा मोटर्स युनियनचे माजी कार्याध्यक्ष अशोक माने, संजय जगताप, समर्थ जगताप, प्रमोद शेट्टी आणि गिरीश शेट्टी आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इखलास सय्यद, रमेश भोरकर, अभिजित पिसाळ, शाहरुख शेख, जावेद पठाण, सूरज मोरे, शुभम वरकुड, अमोल जैस्वार, निलेश कदम, सनी गोडसे, समाधान आणि दाजी चोपडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले, तर सुनील मोरे यांनी आभार मानले.

 

१२६ रक्तदात्यांच्या सहभागातून ‘रक्तदान हेच खरे मानवतेचे दान’ हा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला. आपुलकी मित्र मंडळाच्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00