Home गुन्हे Fugewadi Death Case:फुगेवाडी मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; मृतांच्या कुटुंबियांना मदत द्या – आमदार अमित गोरखे

Fugewadi Death Case:फुगेवाडी मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; मृतांच्या कुटुंबियांना मदत द्या – आमदार अमित गोरखे

फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची मागणी.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी परिसरात घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. गुरुवारी (२८ मे) एका दिवसात आठ नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आमदार गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन (Fugewadi Death Case)केले.

 

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच परिसरातील आठ जणांचा अचानक मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामागील सत्य समोर आणण्यासाठी प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक असल्याचे आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी (Fugewadi Death Case)केली.

 

घटनास्थळी भेट; नागरिकांशी संवाद

 

घटनेची माहिती मिळताच आमदार अमित गोरखे यांनी फुगेवाडी परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांशी संवाद साधत त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. “या दुःखद प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. नागरिकांच्या मनातील संशय दूर करून दोषींना शिक्षा मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी (Fugewadi Death Case) सांगितले.

 

तपास प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही त्यांनी(Fugewadi Death Case) दिला.

 

मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र

 

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार गोरखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली (Fugewadi Death Case) आहे.

त्यामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

 

– मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी.

– फुगेवाडी, दापोडी आणि परिसरातील अवैध हातभट्टी व बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे २४ तासांत उद्ध्वस्त करावेत.

– सर्व मृतांचे शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल तातडीने जाहीर करावेत.

– विषारी दारू किंवा अन्य बेकायदेशीर कारणामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित मुख्य सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करावेत.

– संबंधित भागात पोलिसांची रात्रीची गस्त आणि गुप्तवार्ता यंत्रणा अधिक मजबूत (Fugewadi Death Case) करावी.

 

दोन जणांची प्रकृती चिंताजनक

 

या प्रकरणात काही जणांचा मृत्यू झाला असतानाच सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल हे दोन तरुण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत. आमदार अमित गोरखे यांनी त्यांच्या प्रकृतीचीही माहिती (Fugewadi Death Case) घेतली.

 

“पिंपरी-चिंचवड शहरात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मी स्वतः राज्याच्या गृहविभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी (Fugewadi Death Case) दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00