पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) :सिद्धिविनायक नगरी व श्री विहार येथील श्री निवासीय मित्र मंडळ आणि जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेष्ठ उद्योजक नितांत सोनवणे यांचा वाढदिवसानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. समाजात जेष्ठ नागरिकांचे स्थान केवळ कुटुंबातील सदस्य म्हणून नसून ते घराचे आधारस्तंभ असतात, या भावनेतून हा उपक्रम आयोजित ( Social Activities) करण्यात आला.
जेष्ठ नागरिक हे घरातील अडचण नसून अनुभव, मार्गदर्शन आणि संस्कारांचे भांडार असतात. आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना करूनही त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. याच विचारातून सिद्धिविनायक नगरी आणि श्री विहार जेष्ठ नागरिक मंडळ विविध सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबवत (Social Activities)आहे.
मंडळाच्या माध्यमातून हास्य क्लब, मासिक बैठका, आरोग्य शिबिरे, सहली अशा उपक्रमांद्वारे जेष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण केला जातो. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मंडळातील जेष्ठ सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा जपली जात (Social Activities)आहे.

या अनुषंगाने श्री विहार येथील व्यावसायिक तसेच मंडळाचे सचिव नितांत सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते किशोर गाथाडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात(Social Activities) आला.
या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष जयसिंग भोसले, प्रा. सूर्यकांत पवार, अनिल लोखंडे, हरीभाऊ देशमुख, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज पारखी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि आपुलकीचे (Social Activities)होते.
यावेळी उपस्थितांनी सोनवणे यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत समाजकार्याची प्रेरणा लाभो, अशा शुभेच्छा(Social Activities) दिल्या.
