हरारे : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या शानदार ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ३५ धावां
नी पराभव करत मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. या विजयासह भारताने विश्व गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर या दोन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात (India vs Zimbabwe) आले.
बेबी बॉस म्हणून अल्पावधीतच जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक परिपक्व खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा (India vs Zimbabwe)उचलला.
हरारे येथे झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्याच षटकात १७ धावा जमावत आक्रमक सुरुवात केली. मात्र सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला मुजारबानीने लवकर बाद करत झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून (India vs Zimbabwe) दिले.
यानंतर ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांनी डाव सावरला. वैभवने संयमी आणि जबाबदारीची फलंदाजी करत दुसरे अर्धशतक झळकावले. ईशानसोबत त्याने ७५ धावांची भागीदारी केली. ईशान २९ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरसोबतही त्याने अर्धशतकी भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत(India vs Zimbabwe) पोहोचवले.
शतकाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करणाऱ्या वैभवची ८१ धावांची अप्रतिम खेळी एका शानदार झेलामुळे संपुष्टात आली. त्यानंतर रिंकू सिंग (२५) आणि श्रेयस अय्यर (२७) यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताने २० षटकांत ५ बाद १९२ धावांचा भक्कम डोंगर (India vs Zimbabwe)उभारला.
झिम्बाब्वेकडून इव्हान्सने २, तर मुजारबानी, सिकंदर रझा आणि मधवेरे यांनी प्रत्येकी एक बळी (India vs Zimbabwe)घेतला.
१९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर बेनेटला बाद केले. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सलग दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना बाद करत सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत(India vs Zimbabwe) केली.
भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल पाच झेल सोडल्यामुळे झिम्बाब्वेला पुनरागमनाची संधी मिळाली. रायन बर्लने भारताविरुद्ध अर्धशतक झळकावत झिम्बाब्वेसाठी संघर्ष केला. त्याला बेन करन (२०), मधवेरे (२८) आणि मायर्स (१९) यांनी साथ दिली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि झिम्बाब्वेचा डाव १५७ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने ३५ धावांनी विजय मिळवत मालिका निर्भेळ ३-० अशी आपल्या नावावर (India vs Zimbabwe)केली.
भारतीय गोलंदाजांमध्ये मयंक यादवने ३ बळी घेतले, तर यश ठाकूरने २ बळी टिपले. रवी बिश्नोई आणि युवा अशोक शर्मा यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद (India vs Zimbabwe)केला.
या शानदार कामगिरीबद्दल वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात(India vs Zimbabwe) आले.

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघावर झालेल्या टीकेला या मालिकाविजयाने मोठ्या प्रमाणात उत्तर मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारताचा आत्मविश्वास या विजयामुळे अधिक उंचावला असून, गुणतालिकेतील अव्वल स्थानही संघाने पुन्हा एकदा आपल्या नावावर (India vs Zimbabwe)केले.






