Home गुन्हे Bhatnagar Robbery Case:मारहाण करून मोबाईल व रोकड लुटली; एक आरोपी अटकेत

Bhatnagar Robbery Case:मारहाण करून मोबाईल व रोकड लुटली; एक आरोपी अटकेत

पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील भारतनगर परिसरात युवकाला मारहाण करून १५ हजार रुपयांचा मोबाईल व ७०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. प्रकरणी एक आरोपी अटकेत असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. ११ जून : पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील भारतनगर परिसरात एका युवकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोकड हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली (Bhatnagar Robbery Case)आहे.

याबाबत तोहीद मुन्ना शेख (वय २२, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश चंद कांबळे, सुदर्शन थोरात आणि शिव पवार (सर्व रा. भारतनगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी यश कांबळे याला पोलिसांनी अटक केली (Bhatnagar Robbery Case)आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी पहाटे सुमारे ३ वाजता भारतनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून(Bhatnagar Robbery Case) नेली.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत (Bhatnagar Robbery Case)आहेत

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00