प्रतिनिधी :पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण महाळुंगे येथे अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अज्ञात नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह सुटकेसमध्ये लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली (Chakan Murder Case) आहे.
या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालक घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्याचदरम्यान, एका निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात बालकाचा मृतदेह आढळून आला. शरीरावरील गंभीर जखमा आणि गळा चिरलेली अवस्था पाहून ही हत्या अत्यंत क्रूरतेने करण्यात आल्याचे स्पष्ट (Chakan Murder Case)झाले.
या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे आणि चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तातडीने पाहणी करत तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांची चौकशी सुरू (Chakan Murder Case) आहे.
दरम्यान, नसरापूर परिसरातही ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांनी पुणे जिल्हा अक्षरशः हादरला (Chakan Murder Case) आहे.
गेल्या काही महिन्यांत पुण्यात कोयता गँगची दहशत, रस्त्यावरच्या हाणामाऱ्या, तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि कायद्याचा उरलेला धाक संपत चालल्याची चित्रे सातत्याने समोर येत आहेत. दिवसाढवळ्या होणारे हल्ले, किरकोळ कारणांवरून जीवघेणे वाद आणि आता निष्पाप बालकांवर होणारे अत्याचार — या सर्व घटनांनी समाजमन अस्वस्थ झाले (Chakan Murder Case) आहे.
“आपण नक्की कुठे चाललो आहोत?” हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करू लागला आहे. सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख बदलत चालली आहे का, अशी भीती व्यक्त होत (Chakan Murder Case) आहे.
या अमानुष घटनांनंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होण्यासाठी कठोर आणि निर्णायक पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत(Chakan Murder Case) आहे.
सध्या पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून आरोपींचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, या दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूने निर्माण झालेली वेदना आणि असुरक्षिततेची भावना समाजाला दीर्घकाळ अस्वस्थ करून जाणार (Chakan Murder Case) आहे.
