Home गुन्हे Dr. Vijay Suryawanshi:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचे मोठे निर्णय; मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख मदत, शहरात उभारणार अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे

Dr. Vijay Suryawanshi:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचे मोठे निर्णय; मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख मदत, शहरात उभारणार अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे

मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महत्त्वाचे निर्णय. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, जखमींना आर्थिक सहाय्य, दोषींवर कारवाई आणि शहरभर अत्याधुनिक दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा.

by Admin
Spread the love

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याबरोबरच दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात (Dr. Vijay Suryawanshi)आले.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेमार्फत १० लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय संबंधित ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना ५० लाख रुपयांची अतिरिक्त मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार (Dr. Vijay Suryawanshi)आहे.

तसेच मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळावी यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

दुर्घटनेप्रकरणी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेची कारणे, तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अँटोनी लारा कंपनीच्या प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा निरीक्षकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

याचबरोबर शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, आधुनिक आणि विकेंद्रीकृत करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत, शहरात पारंपरिक कचरा डेपो उभारण्याऐवजी प्रत्येक प्रभागात अत्याधुनिक व दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले (Dr.Vijay Suryawanshi)आहेत.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत, पात्र वारसांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचवेळी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. निष्पक्ष चौकशीतून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात (Dr.Vijay Suryawanshi)येईल.”

मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेने घेतलेल्या या निर्णयांमुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळण्याबरोबरच शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात (Dr.Vijay Suryawanshi)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00