Home गुन्हे Devendra Fadnavis :पिंपरी चिंचवडमध्ये आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी प्रदेशाध्यक्ष अटकेत | सायबर पोलिसांची कारवाई

Devendra Fadnavis :पिंपरी चिंचवडमध्ये आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी प्रदेशाध्यक्ष अटकेत | सायबर पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट आणि नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया सेलच्या प्रदेशाध्यक्षाला सायबर पोलिसांनी अटक केली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमध्ये नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण तसेच आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया सेलच्या प्रदेशाध्यक्षाला सायबर पोलिसांनी अटक केली (Devendra Fadnavis) आहे.

 

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव महादेव विलास बालगुडे (वय ४०, रा. बारामती, पुणे) असे आहे. अॅड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड यांनी २२ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी २४ एप्रिल रोजी बालगुडे याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली (Devendra Fadnavis)  आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल आणि चिथावणीखोर वातावरण निर्माण होईल, अशा स्वरूपाचे मजकूर प्रसारित केल्याचा आरोप (Devendra Fadnavis)  आहे.

 

याशिवाय नक्षलवादी विचारसरणीला समर्थन देणारे आणि सहानुभूती निर्माण करणारे मजकूर प्रसारित केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत (Devendra Fadnavis)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00