Home माझं पिंपरी चिंचवड Cultural News:ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव

Cultural News:ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव

तबल्याच्या सुरेल तालातून शहराच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराचा महापालिकेकडून गौरव

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात (Cultural News) आला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर तथा नगरसदस्या अपर्णा डोके, नगरसदस्या मनिषा चिंचवडे, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. तसेच धोंडीराम सायकर यांची मुले नरेंद्र सायकर, निलेश सायकर आणि नातू साहिल सायकर हेही यावेळी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी( Cultural News)केले.

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांनी आपल्या तबल्याच्या सुरेल आणि प्रभावी तालातून पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध अधिष्ठान दिले आहे. बालवयापासून संगीत साधनेशी जुळलेले त्यांचे नाते आजही अखंडपणे सुरू असून, आपल्या नेमक्या आणि भावपूर्ण तबलावादनातून त्यांनी अनेक नामवंत गायक व कलावंतांच्या मैफिली संस्मरणीय केल्या ( Cultural News)आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपत त्यांनी विविध सांगीतिक व्यासपीठांवर तबल्याची प्रभावी साथसंगत केली आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, विविध स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी शहराच्या सांस्कृतिक वातावरणाला अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले( Cultural News) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00