Home माझं पिंपरी चिंचवड Alandi Palkhi Sohala:आळंदीत माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याची भक्तिमय सांगता; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Alandi Palkhi Sohala:आळंदीत माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याची भक्तिमय सांगता; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

कामिका एकादशीनिमित्त आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली. परतीच्या पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता.

by Admin
Spread the love

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी अलंकापुरी अर्थात आळंदीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ‘माऊली-माऊली’चा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात आळंदीकरांसह हजारो भाविकांनी लाडक्या माऊलींचे स्वागत(Alandi Palkhi Sohala) केले.

कामिका एकादशीच्या निमित्ताने रविवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. एकादशीच्या पावन पर्वावर एक लाखांहून अधिक भाविकांनी आळंदीत येऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन (Alandi Palkhi Sohala)घेतले.

दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शन मंडप भाविकांनी पूर्ण भरल्यानंतर रांगेचा विस्तार आळंदी नगरपरिषद चौकासमोरील नवीन पुलापर्यंत झाला होता. इंद्रायणी नदीचा घाटही भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. संपूर्ण परिसरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले (Alandi Palkhi Sohala)होते.

दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांची नगरप्रदक्षिणा पार पडली. त्यानंतर हजेरी मारुती मंदिरात मानाच्या दिंड्यांची हजेरी झाली. यावेळी नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक विधींनंतर यंदाच्या पालखी सोहळ्याची सांगता (Alandi Palkhi Sohala)झाली.

महिनाभर पायी वारी करत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांना आता घराची ओढ लागली आहे. पालखी सोहळ्याची सांगता होताच वारकरी आणि भाविक आळंदीतून आपापल्या गावांकडे परतीच्या प्रवासाला निघाले. एसटी बस, खासगी वाहने तसेच अन्य प्रवासी साधनांमधून भाविक माघारी परतत (Alandi Palkhi Sohala)आहेत.

मात्र, परतीच्या प्रवासातही वारीचा भक्तिरस कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनांमधून ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष आणि हरिनामाचा गजर सुरूच आहे. महिनाभराच्या वारीनंतर माऊलींच्या दर्शनाची तृप्ती, विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी लीन झाल्याचे समाधान आणि पुढील वारीची आतुरता मनात घेऊन वारकरी आपल्या घराकडे मार्गस्थ झाले (Alandi Palkhi Sohala)आहेत.

वारीचा प्रवास संपला असला, तरी वारकऱ्यांच्या मनातील माऊलींची भक्ती मात्र अविरत सुरूच राहणार आहे. आळंदीच्या पवित्र भूमीतून परतताना प्रत्येक वारकऱ्याच्या ओठांवर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष आणि मनात पुढील वारीची आस कायम (Alandi Palkhi Sohala)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00