Home माझं पिंपरी चिंचवड Kalpana Kshirsagar:कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान; बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव

Kalpana Kshirsagar:कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत सन्मान; बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव

शिक्षण, संगीत, कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कल्पना प्रकाश क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत मानपत्र देऊन सन्मान.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २ सप्टेंबर 2026) : महिलांनी ज्ञान, कला आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत पुढे येणे ही प्रगत समाजाची ओळख आहे. शिक्षणापासून संगीतापर्यंत, कलेपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कल्पना प्रकाश क्षीरसागर यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वासोबतच समाजातील प्रत्येक महिलेच्या प्रतिभा, आत्मविश्वास आणि स्वप्नांचा गौरव आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी (Kalpana Kshirsagar)केले.

 

ज्ञान, कला, संस्कृती, शिक्षण, संगीत आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात (Kalpana Kshirsagar)आला.

 

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपाइं नेते कुणाल वाव्हळकर, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, शितल शिंदे, मधुरा शिंदे, सविता आसवानी यांच्यासह नगरसदस्य, नगरसदस्या आणि विविध विभागप्रमुख उपस्थित(Kalpana Kshirsagar) होते.

 

लेखन, चित्रकला आणि हस्तकला यांसह विविध कलाक्षेत्रांत क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या कलात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेत पुणे व मुंबई आकाशवाणीवर त्यांच्या कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. शिक्षण, संगीत आणि कलेच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी संवाद साधत स्वतंत्र ओळख निर्माण केली (Kalpana Kshirsagar)आहे.

 

महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जागतिक स्तरावरील ‘वुमन ऑफ द वर्ल्ड’ हा सन्मान मिळाला आहे. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला (Kalpana Kshirsagar)आहे.

 

पिंपरी-चिंचवड हे कष्टकरी, उद्यमशील आणि गुणवंत नागरिकांचे शहर असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी महापालिका सकारात्मकतेने उभी राहील. त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर आणणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असेही महापौर लांडगे यांनी(Kalpana Kshirsagar) सांगितले.

 

मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी(Kalpana Kshirsagar) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00