पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, रस्ते आणि विविध नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee) आली.
सभेला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित (PCMC Standing Committee) होते.
शहरातील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आवश्यक ठिकाणी व्हॉल्व बसविणे तसेच नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ३१ (नवी सांगवी-रामनगर), प्रभाग क्र. २६ (पिंपळे निलख) आणि प्रभाग क्र. २९ (पिंपळे गुरव) येथे जलनिस्सारण नलिका टाकणे व त्यामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. अ, ब, क आणि फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारण नलिकांची आधुनिक यांत्रिकी पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्याचाही निर्णय घेण्यात (PCMC Standing Committee) आला.
याशिवाय ग आणि ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, गांधी नगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधी नगर, तापकीर नगर, अण्णाभाऊ साठे नगर, काळाखडक आणि म्हतोबानगर या झोपडपट्टी भागांमधील जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यासाठी कामे हाती घेण्यात येणार (PCMC Standing Committee) आहेत.
आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी अत्याधुनिक अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टिम खरेदीस मंजुरी देण्यात आली. आकुर्डी येथील नवीन रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणेची वार्षिक देखभाल व दुरुस्ती, तसेच तालेरा रुग्णालयातील दरवाजे-खिडक्यांसाठी पडदे बसविणे आणि लिफ्ट यंत्रणेची तीन वर्षांसाठी देखभाल करण्यासही मान्यता देण्यात (PCMC Standing Committee)आली.
स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने प्रभाग क्र. २३, २४ आणि २७ मधील सार्वजनिक शौचालयांची यांत्रिक पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यासाठी वाहन, चालक आणि कामगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांची भविष्य निर्वाह निधी (PF) रक्कम थेट वैयक्तिक खात्यात जमा करण्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee) आली.
पायाभूत सुविधांअंतर्गत स्पाईन रस्त्यावरील खोदकामामुळे तयार झालेले चर आणि पावसामुळे पडलेले खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रजिमा-३१ रस्त्यावरील भूमकर चौकाचे सुशोभीकरण तसेच टेल्को रस्त्यावर यशवंतनगर चौक ते दुर्गानगर चौकादरम्यान रोड मार्किंग आणि दुभाजक रंगसफेदीची कामे करण्यात येणार (PCMC Standing Committee) आहेत.
फुगेवाडी येथील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईन व ३० मीटर एचसीएमटीआरखाली भुयारी मार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या देखभालीसाठी दहा वर्षांचा निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात(PCMC Standing Committee) आला.
सामाजिक आणि सांस्कृतिक सुविधांना चालना देण्यासाठी शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर-चिंचवड येथील मानधनावरील सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ देण्यात आली. विविध प्रभागांतील उद्याने, शाळा, दुभाजक आणि मोकळ्या जागांमध्ये तैवान लॉन, ग्रीन लॉन, अमेरिका ब्लू लॉन आणि पास्को लॉन विकसित करण्यास मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee) आली.
महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सी नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रभाग क्र. १६ (मामुर्डी-किवळे) येथे पुश-थ्रू पद्धतीने ९०० मिमी व्यासाची ९० मीटर लांबीची एम.एस. ड्रेनेज केसिंग पाइप टाकण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच परिसरातील महापालिका इमारती, स्मशानभूमी आणि इतर ठिकाणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार (PCMC Standing Committee) आहेत.
स्थायी समितीच्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून नागरिकांना अधिक दर्जेदार, सक्षम आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी (PCMC Standing Committee) सांगितले.

