Home क्रीडा India Vs Afghanistan:भारताचा अफगाणिस्तानवर तीन गडी राखून शानदार विजय; मालिकेत विजयी आघाडी

India Vs Afghanistan:भारताचा अफगाणिस्तानवर तीन गडी राखून शानदार विजय; मालिकेत विजयी आघाडी

अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अर्शदीप सिंग ठरले विजयाचे शिल्पकार

by Admin
Spread the love

(दिल्ली, विवेक कुलकर्णी )भारतीय संघाने अफगाणिस्तानवर पहिल्या टी-२० सामन्यात तीन गडी राखून शानदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने बीसीसीआयच्या सहकार्याने भारतात आयोजित करण्यात आलेल्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने प्रभावी कामगिरी केली. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अर्शदीप सिंग यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे भारताने ४४ चेंडू राखून विजय (India Vs Afghanistan) मिळवला.

 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या सामन्यात भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. नाणेफेक जिंकून भारताने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित(India Vs Afghanistan) केले.

 

अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर रहमानुल्लाह गुरबाजला बाद करत अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजीवर सातत्याने दबाव कायम ठेवला. अवघ्या ४३ धावांवर अफगाणिस्तानचे पाच फलंदाज माघारी परतले (India Vs Afghanistan) होते.

 

मात्र, अझमतुल्लाह ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे अफगाणिस्तानच्या डावाला काही प्रमाणात स्थैर्य मिळाले. मात्र, नबी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या फलंदाजीची पडझड सुरू झाली. अखेर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १५६ धावांत बाद(India Vs Afghanistan) झाला.

 

भारतीय संघाची मजबूत फलंदाजी पाहता १५७ धावांचे लक्ष्य तुलनेने सोपे मानले जात होते. मात्र, भारताची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संजू सॅमसनला पुन्हा संघात स्थान देत वैभव सूर्यवंशीला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संजूला या सामन्यात दुहेरी आकडी धावसंख्याही गाठता आली (India Vs Afghanistan) नाही.

 

त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमक प्रहार केला. दोघांनीही प्रभावी फलंदाजी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. अभिषेकने जवळपास सर्वच गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना तो ८३ धावांवर बाद झाला. ईशान किशननेही शानदार फलंदाजी करत ४३ धावा केल्या; मात्र, त्याला अर्धशतक पूर्ण करता आले (India Vs Afghanistan) नाही.

 

या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. उर्वरित औपचारिकता तिलक वर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी पूर्ण केली. भारताने ४४ चेंडू शिल्लक ठेवत तीन गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी (India Vs Afghanistan) घेतली.

अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा टी-२० सामना १५ सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार(India Vs Afghanistan) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00