Home माझं पिंपरी चिंचवड Suryadatta Education Foundation:‘सूर्यदत्त’तर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त १४ ते २१ ऑगस्ट उपक्रम सप्ताह

Suryadatta Education Foundation:‘सूर्यदत्त’तर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त १४ ते २१ ऑगस्ट उपक्रम सप्ताह

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त १४ ते २१ ऑगस्टदरम्यान विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

by Admin
Spread the love

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या संकल्पनेवर आधारित या सप्ताहात देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार (Suryadatta Education Foundation)आहेत.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. शिक्षणासोबत संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर या उपक्रमांचा भर (Suryadatta Education Foundation)आहे .

या सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या १५ वीरपत्नींचा ‘वीर नारी सन्मान’ करून गौरव. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कर्नल पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सूर्य चक्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. यासोबतच देशभक्तिपर फॅशन शो आणि विशेष नाट्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले(Suryadatta Education Foundation) आहे.

‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानांना बळ देण्यासाठी पारंपरिक हस्तकला व स्वदेशी हस्तनिर्मित उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ‘फिट इंडिया’अंतर्गत क्रीडा, योग व फिटनेस सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित विविध राज्यांचे लोकनृत्य, समूहगायन, देशभक्तिपर संगीताचा ऑर्केस्ट्रा तसेच भारतीय खाद्यसंस्कृतीचे स्टॉल्स हेही या सप्ताहाचे आकर्षण ठरणार (Suryadatta Education Foundation)आहेत.

विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, पुस्तक प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. तसेच व्यसनमुक्तीविषयक व्याख्यान, विविध सामाजिक संकल्प, गोशाळा आणि अनाथालयाला भेटी अशा सामाजिक उपक्रमांचाही समावेश (Suryadatta Education Foundation)आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतापुरता मर्यादित न राहता ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पना विद्यार्थ्यांच्या विचारात व कृतीत रुजविण्याचे माध्यम ठरावे. सूर्यदत्त प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देतानाच जबाबदार, सुजाण आणि देशभक्त नागरिक घडविण्यासाठी कटिबद्ध (Suryadatta Education Foundation)आहे.”

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना रुजविणे ही काळाची गरज आहे. वीर नारींचा सन्मान आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सूर्यदत्तचा प्रयत्न (Suryadatta Education Foundation)आहे.”

‘माझा देश, माझी जबाबदारी’ हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रप्रेम, भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि देशसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर भर देण्यात आला(Suryadatta Education Foundation) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00