Home आरोग्य Reshmatai Katale:प्रभाग क्र. १६ मधील विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची मागणी; रेश्माताई कातळे यांची महापालिकेकडे मागणी

Reshmatai Katale:प्रभाग क्र. १६ मधील विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची मागणी; रेश्माताई कातळे यांची महापालिकेकडे मागणी

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळासाठी स्वतंत्र मैदान आणि क्रीडा सुविधा देण्याची मागणी

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :प्रभाग क्र. १६ मधील महापालिकेच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत आहेत. मात्र, योग्य खेळाचे मैदान आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका रेश्माताई बापू कातळे यांनी केली (Reshmatai Katale) आहे.

 

त्यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी मोठी आवड असून अनेक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवू शकतात. परंतु मैदानांच्या अभावामुळे त्यांचा सराव मर्यादित राहतो. विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ आणि सुविधा मिळाल्यास भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते यश मिळवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त (Reshmatai Katale)केला.

 

महापालिकेने प्रभागातील शाळांसाठी स्वतंत्र क्रीडांगण, आवश्यक क्रीडा साहित्य तसेच प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली( Reshmatai Katale)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00