Home माझं पिंपरी चिंचवड Pimpri-Chinchwad Festival: बहारदार कवीसंमेलनाने रंगली काव्याची मैफल

Pimpri-Chinchwad Festival: बहारदार कवीसंमेलनाने रंगली काव्याची मैफल

पिंपरी-चिंचवड महोत्सवात रामकृष्ण मोरे नाट्यगृहात बहारदार कवीसंमेलन; विविध विषयांवरील कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

by Admin
Spread the love

(चिंचवड) : रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील मोरया गोसावी रंगमंच सभागृहात २० सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महोत्सवानिमित्त बहारदार कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयांवरील कविता, सामाजिक भान, भावना आणि विचारांच्या सुरेख मिलाफाने रसिकांना काव्यरंगाची मेजवानी (Pimpri Chinchwad Festiva)मिळाली.

 

कवीसंमेलनाच्या प्रारंभी विरोधी पक्षनेते तथा लोकनेते भाऊसाहेब भोईर यांचा काव्यपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना भोईर म्हणाले, “पुणे ही जर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल, तर पिंपरी-चिंचवड ही सांस्कृतिक उपराजधानी आहे.” कला, साहित्य आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रांत पिंपरी-चिंचवडकर कुठेही कमी नसल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल दहा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महोत्सव पुन्हा सुरू झाल्याने रसिक, साहित्यिक आणि कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचेही त्यांनी नमूद(Pimpri Chinchwad Festiva) केले.

 

या कवीसंमेलनात वंदना इन्नानी, राजेंद्र घावटे, तुकाराम पाटील, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, सुरेश कंक, अरुण कांबळे, पौर्णिमा कोल्हे, निलेश शेंबेकर, दिनेश भोसले, सविता इंगळे, देवेंद्र गावंडे, प्रदीप गांधलीकर, पितांबर लोहार, सुभाष चव्हाण, झुबेन शेख, नीलिमा फाटक, सुप्रिया लिमये, हेमंत जोशी, माधुरी डिसुझा, हिंगणकर कवी, संजय सिंगलवार, आय. के. शेख, रेणुका हजारे, संदीप चव्हाण, माधुरी विधाटे आणि अशोक टाकळे यांनी कविता सादर (Pimpri Chinchwad Festiva)केल्या.

 

सामाजिक वास्तव, नात्यांची हळवी वीण आणि जीवनातील विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कैलास भैरट आणि सीमा गांधी यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कवीसंमेलनात रंगत(Pimpri Chinchwad Festiva) आणली.

 

पिंपरी-चिंचवडच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कवीसंमेलनाने महोत्सवाच्या आनंदात सुंदर काव्यरंग (Pimpri Chinchwad Festiva)भरला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00