Home आरोग्य Pcmc Water Supply:एल-निनोच्या प्रभावामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; उद्यापासून अंमलबजावणी

Pcmc Water Supply:एल-निनोच्या प्रभावामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; उद्यापासून अंमलबजावणी

एल-निनोच्या प्रभावामुळे पवना धरणातील पाणीसाठा १९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली असून २१ जून २०२६ पासून अंमलबजावणी होणार आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. २० जून : एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनला विलंब झाल्याने आणि पाऊस अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या १९ टक्क्यांवर आल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दि. २१ जूनपासून करण्यात येणार (Pcmc Water Supply)आहे.

 

या कपातीमुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होण्याची तसेच कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेने (Pcmc Water Supply)आहे.

 

मान्सून लांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, येत्या काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीपुरवठ्यातील कपात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील पाणी व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले (Pcmc Water Supply)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00