दि. ०६ मे २०२६ : आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. आघाडीची आयटी कंपनी Cognizant आपल्या ‘प्रोजेक्ट लीप’ उपक्रमाअंतर्गत सुमारे १२ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी या प्रक्रियेचा सर्वाधिक परिणाम भारतातील कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात (IT Layoffs 2026)आहे .
कंपनीच्या या निर्णयामागे केवळ खर्चकपात नाही, तर कामकाजातील बदलती पद्धतही कारणीभूत असल्याचे दिसत आहे. मोठ्या टीम्सऐवजी कमी पण अधिक कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांवर भर देण्याचा ट्रेंड वाढत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Ravi Kumar S यांनीही ‘लहान पण प्रभावी’ कार्यबलाची संकल्पना पुढे येत असल्याचे संकेत दिले(IT Layoffs 2026) आहेत.
ग्राहकांच्या अपेक्षांमध्येही मोठा बदल झाला आहे. कमी वेळात अधिक परिणाम देण्याची मागणी वाढत असताना, कंपन्या प्रशिक्षणावर होणारा खर्च कमी करत आहेत. त्यामुळे नव्या उमेदवारांसाठी संधी कमी होत चालली आहे, तर अनुभवी कर्मचाऱ्यांनाही नोकरीची हमी उरलेली(IT Layoffs 2026) नाही.
या बदलाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन आहे. पारंपरिक सेवा क्षेत्रांमध्ये मागणी घटत असताना, कमी मनुष्यबळात अधिक उत्पादनक्षमतेवर भर दिला जात आहे. TCS, Accenture, HCLTech आणि Oracle यांसारख्या कंपन्यांनीही यापूर्वीच पुनर्रचना किंवा कपातीचे पाऊल उचलले (IT Layoffs 2026)आहे.
एकूणच, आयटी क्षेत्रात सुरू असलेले हे बदल तात्पुरते नसून, नव्या कार्यपद्धतीची नांदी असल्याचे मानले जात आहे. बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कौशल्यवृद्धीकडे वळणे गरजेचे ठरत (IT Layoffs 2026)आहे.
