पिंपरी, –पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण २,२१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण (PCMC Election 2025 )करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणात अर्जांचे वितरण झाले(PCMC Election 2025 )आहे.
दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्रभागनिहाय वितरित नामनिर्देशन अर्जांची संख्या :
अ क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ – अनुक्रमे ६८, ७८, ६७ व १४३
एकूण : ३५६
ब क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ – अनुक्रमे ७९, ९६, ४८ व ७७
एकूण : ३००
क क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ – अनुक्रमे ६५, २३, ८४ व १४३
एकूण : ३१५
ड क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ – अनुक्रमे ८५, ९०, ३४ व ८३
एकूण : २९२
इ क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ – अनुक्रमे ६९, ४८, ५५ व ३८
एकूण : २१०
फ क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ – अनुक्रमे ३५, ८५, २३ व ९१
एकूण : २३४
ग क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ – अनुक्रमे ४२, ४५, ४३ व ५९
एकूण : १८९
ह क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० – अनुक्रमे ५१, ८३, ११७ व ६५
एकूण : ३१६
एकूण वितरित नामनिर्देशन अर्ज : २,२१२
