पुणे : कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे या सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोशी येथील हॉटेल माइलस्टोन येथे उत्साहात पार पडली. या सभेत सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. बापूसाहेब बाबुराव जाधव तर उपाध्यक्षपदी श्री. संभाजीराव बाळासाहेब चौधरी यांची निवड करण्यात ( Kulswamini Pratishthan)आली.
कुलस्वामिनी प्रतिष्ठान गेल्या सुमारे १२ वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, आळंदी ते पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक व वस्तुरूप सहाय्य, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन असे अनेक उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने राबविण्यात(Kulswamini Pratishthan )येतात.
याशिवाय कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यावरण व संस्कार संवर्धन या विषयांवर समाजप्रबोधनाचे कार्य प्रतिष्ठानमार्फत सुरू असून दरवर्षी “गोंदण दिवाळी विशेषांक” हे प्रतिष्ठानचे विशेष प्रकाशन प्रकाशित केले (Kulswamini Pratishthan)जाते.
नूतन कार्यकारिणी (२०२५–२०३०) पुढीलप्रमाणे :
• अध्यक्ष : श्री. बापूसाहेब बाबुराव जाधव
• उपाध्यक्ष : श्री. संभाजीराव बाळासाहेब चौधरी
• सचिव : डॉ. चांगदेव दशरथ पिंगळे
• खजिनदार : श्री. विठ्ठलराव बबनराव जाधव
या निवडणुकीत श्री. सुखदेव साकोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य मा. प्राचार्य श्री. पी. के. गाडिलकर सर, मावळते अध्यक्ष डॉ. नंदकुमार माळशिरसकर, श्री. ज्ञानेश्वर खैरे, डॉ. सुभाष पिंगळे, श्री. अरुणराव साकोरे, श्री. प्रशांत एखंडे, मा. प्राचार्या सौ. उज्वला पिंगळे, सौ. शांता साकोरे, श्री. संदीप चौधरी, श्री. दिनेश वाडेकर, श्री. अर्जुन जाधव, श्री. मच्छिंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित (Kulswamini Pratishthan)होते.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड व पाबळ परिसरातून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत (Kulswamini Pratishthan)आहे.
