Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम

Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ एप्रिल ते २२ जून २०२६ दरम्यान ८२० ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामे, नाले, रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या.

by Admin
Spread the love

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरभर अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवत एकूण ८२० ठिकाणी कारवाई केली. या मोहिमेत १ लाख ४ हजार २७०.९६ चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात (Pcmc Encroachment Drive)आले.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच विविध नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटवून सुमारे ८३९ चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले. याशिवाय रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी अडथळा ठरणाऱ्या फेरीवाले, पथारीवाले व इतर मिळून ३४६ अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात (Pcmc Encroachment Drive)आली.

 

क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वाधिक २२९ कारवाया ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाल्या. त्यापाठोपाठ ‘इ’मध्ये १०३, ‘ड’मध्ये १००, ‘फ’मध्ये ९५, ‘ब’मध्ये ९४, ‘अ’मध्ये ८४, ‘ग’मध्ये ६४ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात ५१ कारवाया करण्यात (Pcmc Encroachment Drive)आल्या.

 

पावसाळ्यात नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवणे, पूरस्थिती टाळणे, सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे आणि अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या उद्देशाने ही मोहीम सातत्याने सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अनधिकृत बांधकामे व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना प्रोत्साहन न देता शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले(Pcmc Encroachment Drive)आहे .

 

कोट :

“सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत. त्यावरील अतिक्रमणामुळे नागरी सुविधा आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अतिक्रमणमुक्त आणि सुबक शहरासाठी सहकार्य करावे.”

 

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड (Pcmc Encroachment Drive)महानगरपालिका

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00