(प्रतिनिधी) :पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात (Ramesh Waknis) आला.
शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या तसेच साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सभेत सन्मान करण्याच्या धोरणानुसार हा विशेष सत्कार करण्यात आला. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानपत्राचे वाचन (Ramesh Waknis) केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित (Ramesh Waknis) होते.
रमेश वाकनीस यांनी कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी साहित्य व रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचे ‘पूर’ आणि ‘आकाशा आणि काही कविता’ हे कवितासंग्रह, तसेच ‘ओळखावा धोंडा अंतरीचा’ आणि ‘कहाणी अखेरच्या संपाची’ ही नाटके विशेष गाजली आहेत. प्राचीन पाली भाषेतील ‘धम्मपद’ या धर्मग्रंथाचा मराठी काव्यानुवाद करून त्यांनी साहित्य आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमी समृद्ध करण्याबरोबरच नव्या पिढीत कलासंस्कार रुजविण्याचेही कार्य केले(Ramesh Waknis) आहे.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “रमेश वाकनीस यांनी साहित्य, नाटक, अभिनय आणि संस्कृतीसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या संवेदनशील लेखनाने आणि प्रभावी रंगकर्माने शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही महापालिकेसाठी अभिमानाची बाब (Ramesh Waknis) आहे.”



