(फुगेवाडी, प्रतिनिधी ): भविष्यातील विकासाची जीवनवाहिनी ठरणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. महा मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात सोमवारी (दि. २७) निगडी (भक्ती-शक्ती चौक) ते चाकण या मेट्रो मार्गाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करण्यात (Pune Metro Phase 2)आला.
निगडी–चाकण मेट्रो ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक परिसराच्या भविष्यातील विकासाची महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात(Pune Metro Phase 2) आले.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावणजी हर्डीकर यांनी सुधारित डीपीआरचे सादरीकरण केले. प्रस्तावित मार्गाच्या आराखड्यात आवश्यक बदल करण्यात आले असून सुधारित प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹१२,९३७.२३ कोटी आहे. हा मार्ग ४५.२९५ किलोमीटर लांबीचा असून त्यावर एकूण ३४ स्थानके प्रस्तावित(Pune Metro Phase 2) आहेत.
सुधारित डीपीआरनुसार, भक्ती-शक्ती चौक ते चाकण हा संपूर्ण मेट्रो मार्ग उन्नत (Elevated) स्वरूपात उभारण्यात येणार (Pune Metro Phase 2)आहे.
या बैठकीस पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, आमदार महेश लांडगे, उमाताई खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच यूएमटीसी (UMTC)चे सल्लागार रजनीश पोडवळ आदी उपस्थित (Pune Metro Phase 2)होते.
प्रस्तावित ३४ मेट्रो स्थानके
भक्ती-शक्ती, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, आदर्श नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गवळी माथा चौक, सेंच्युरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१, गोडाऊन चौक, PIECC, भारतमाता मोशी, चिंबळी फाटा, बारगे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि (Pune Metro Phase 2)चाकण.
निगडी–चाकण मेट्रो मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विशेषतः वाकड, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांतील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा(Pune Metro Phase 2) आहे.
नागरिकांना होणारे प्रमुख फायदे
• निगडी ते चाकण प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होईल.
• वाकड, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
• चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होईल.
• विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळेल.
• पिंपरी-चिंचवडमधील वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल.
• खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
• मार्गालगतच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.
या सुधारित डीपीआरला लवकरात लवकर आवश्यक प्रशासकीय व शासकीय मंजुरी मिळून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निगडी–चाकण मेट्रो प्रकल्पाला गती मिळत असून ही बैठक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात(Pune Metro Phase 2) आहे.




