Home माझं पिंपरी चिंचवड Chakan MIDC : चाकण एमआयडीसीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, PMRDA, PWD आणि MIDCच्या अखत्यारीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश. अतिक्रमण हटविण्यासह बेकायदा पार्किंगवरही कारवाईचे निर्देश.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी (Chakan MIDC)दिला.

 

चाकण परिसरातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक व्यवस्था, पावसाळी उपाययोजना तसेच नदी-नाल्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एमआयडीसी, PMRDA, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित(Chakan MIDC) होते.

 

जिल्हाधिकारी डुडी यांनी नदी, नाले आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे संबंधितांनी एका महिन्याच्या आत स्वखर्चाने हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून ती हटवून खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असे स्पष्ट (Chakan MIDC)केले.

 

याशिवाय धोकादायक गतिरोधक काढून मानकांनुसार नवीन गतिरोधक उभारणे, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता चिन्हे, परावर्तक पट्ट्या बसविणे आणि रस्त्यावरील बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात(Chakan MIDC) आले.

 

तळेगाव चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, वाघजाई नगर–खराबवाडी रोड, म्हाळुंगे इंगळे, खालुंब्रे, शिंदे वासुली, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा, बिरदवडी फाटा तसेच दवने मळा ते द्वारका सिटी रोड आणि कॉर्निंग कंपनी ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग या मार्गांवरील खराब रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात (Chakan MIDC)आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00