(प्रतिनिधी )पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणांवरून घडलेल्या दोन वेगवेगळ्या हिंसक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली परिसरात हॉर्न वाजवल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, तर चिंचवडमध्ये भररस्त्यात झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली (PCMC Crime News) आहे.
पहिली घटना चिखलीतील टॉवर लाईन परिसरात बुधवार (दि. १५) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. आर्यन राजाराम चव्हाण (वय २०) हे मित्रासह दुचाकीवरून जात असताना रस्त्यात काही युवक उभे होते. त्यांनी हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी “आम्ही या भागातील भाई आहोत” असे म्हणत आर्यन यांना पकडून ठेवले आणि डोक्यावर व हातावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरात कोयता फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणी चार विधीसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलिस तपास करत (PCMC Crime News) आहेत.
दरम्यान, दुसरी घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे ७ एप्रिल रोजी रात्री घडली. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी मनोज भिल्लू राठोड (वय ३४) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली (PCMC Crime News) आहे.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला घरातून बाहेर ओढून रस्त्यावर नेऊन मारहाण केली. आरोपी अनुज भोईटे याने धारदार वस्तूने डोळ्यावर वार करून जखमी केले. सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनुज अशोक भोईटे, रोशन राजेंद्र राणे, संकेत संजय शेळके आणि अक्षय शरद चौधरी यांना अटक (PCMC Crime News) केली.
तसेच अन्य तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत (PCMC Crime News) आहे.
