(चिंचवड, दि. २१प्रतिनिधी ): चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सखी सावित्री समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि महिला सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन उत्साहात करण्यात (Pratibha College Chinchwad)आले.
महिला सुरक्षा सत्रामध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाच्या ललिता फडतरे आणि ज्योती चापुडे यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा, आपत्कालीन महिला हेल्पलाईन, सायबर सुरक्षितता तसेच स्वसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांची माहिती दिली. “तुमची सुरक्षा तुमच्या स्वतःच्या हातात आहे. कोणत्याही प्रसंगी घाबरू नका, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. दामिनी पथक तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे,” असा विश्वास त्यांनी विद्यार्थिनींना (Pratibha College Chinchwad) दिला.
यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. किमया आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे मेजर राजू ढमाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच ध्यानाचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिले. योगाच्या नियमित सरावामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि परीक्षेच्या काळात मन शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज किमान १५ मिनिटे योग करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना (Pratibha College Chinchwad)दिला.
कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार आणि प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक डॉ. शबाना शेख आणि प्रा. रुची यादव यांनी केले. यावेळी उपस्थित प्रशिक्षक आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात (Pratibha College Chinchwad)आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच विभागप्रमुख डॉ. श्रुती गणपुले यांचे मार्गदर्शन (Pratibha College Chinchwad)लाभले.
महिला सुरक्षा जनजागृती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धन या दोन्ही विषयांचा प्रभावी संगम घडवून आणणारा हा दुहेरी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त (Pratibha College Chinchwad)ठरला.
