प्रतिनिधी :इंडियन डेंटल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड) च्या अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची निवड झाली आहे. असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा 11 डिसेंबर 2025 रोजी वाल्हेकरवाडी येथील हॉटेल नियोवूड्स येथे पार पडली. या सभेत 2026 सालासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर (Dr Vinayak Shetty)करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत डॉ. विनायक कुमार शेट्टी अध्यक्ष, डॉ. गौरव विसपुते सचिव आणि डॉ. दिपाली पाटेकर खजिनदार म्हणून निवडून आले (Dr Vinayak Shetty)आहेत.
डॉ. विनायक कुमार शेट्टी यांचा जन्म कर्नाटकातील उडपी तालुक्यातील केंजूर येथे सुशिक्षित परिवारात झाला. ते श्री. भास्कर शेट्टी आणि सौ. विनोदा शेट्टी यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी दंतवैद्यकीय शिक्षण मंगळूर येथील के.वी.जी. दंत वैद्यकीय महाविद्यालयातून यशस्वीरीत्या पूर्ण(Dr Vinayak Shetty) केले.

सन 2002 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील वाय.सी.एम. सरकारी रुग्णालयात दंतवैद्यकीय सेवेला सुरुवात करत त्यांनी गेली 23 वर्षे शहरात दंत उपचार आणि सामाजिक कार्याची उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या निवडीमुळे दंतवैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात(Dr Vinayak Shetty) आहे.
