Home गुन्हे PCMC Crime News:पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई: देशी पिस्टल व जिवंत राऊंडसह आरोपी अटक

PCMC Crime News:पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई: देशी पिस्टल व जिवंत राऊंडसह आरोपी अटक

काळेवाडी येथे गुन्हे शाखा युनिट 01 ची धडक कारवाई. विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत राऊंडसह 22 वर्षीय आरोपीला अटक. पंचनाम्यात 50,500 रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त. आरोपीवर आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:गुन्हे शाखा युनिट 01, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या एका धाडसी कारवाईत विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून मिळालेला एकूण 50,500 रुपये किमतीचा शस्त्रसाठा पंचासमक्ष पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला (PCMC Crime News) आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट 01 चे अधिकारी आणि अंमलदार 11 डिसेंबर 2025 रोजी आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार सागर अवसरे आणि पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार, आरोपी रोहित महादेव आगरखेड (वय 22, रा. अमर नढे यांची रूम, पवनानगर, काळेवाडी, पुणे) हा विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची(PCMC Crime News) खात्री पटली.

 

सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउप-निरीक्षक कर्मराज गावडे, हवालदार जयवंत राऊत, सागर अवसरे, लक्ष्मीकांत पतंगे, तेजस भालचिम आणि विजय जानराव यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्या कब्जातून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असे बेकायदेशीर शस्त्र(PCMC Crime News )मिळाले.

 

ही शस्त्रे आरोपीने कोणताही कायदेशीर परवाना नसताना अनधिकृतरीत्या जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला (PCMC Crime News) आहे.

 

आरोपीचा पूर्व गुन्हेगार इतिहास देखील उघडकीस आला आहे. पूर्वी त्याच्यावर अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दोन गुन्ह्यांची नोंद आहे—

1. गुन्हा क्रमांक 23/2024, भादवी कलम 324, 323, 504, 34

2. गुन्हा क्रमांक 63/2023, भादवी कलम 379, 511, 34

ही महत्त्वपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट 01 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली(PCMC Crime News) करण्यात आली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00