Home महाराष्ट्र Pavanathadi Jatra 2026:हस्तकला, खाद्यपदार्थ व पारंपरिक वस्तूंच्या प्रदर्शन-विक्रीसाठी महिला बचत गटांना नावनोंदणीचे आवाहन

Pavanathadi Jatra 2026:हस्तकला, खाद्यपदार्थ व पारंपरिक वस्तूंच्या प्रदर्शन-विक्रीसाठी महिला बचत गटांना नावनोंदणीचे आवाहन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान सांगवी येथे पवनाथडी जत्रा आयोजित. महिला बचत गटांसाठी हस्तकला, खाद्यपदार्थ व गृहउद्योग उत्पादनांच्या प्रदर्शन-विक्रीसाठी नावनोंदणी सुरू. अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2026.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी – सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समाज विकास विभागामार्फत दि. २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर ‘पवनाथडी जत्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्यांचा विकास करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे हा या जत्रेचा मुख्य उद्देश (Pavanathadi Jatra 2026)आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येणारी ही जत्रा महिला उद्योजिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. विविध हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यामध्ये केली जाणार (Pavanathadi Jatra 2026) आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील जत्रेसाठी सहभाग अर्जांचे वाटप व स्वीकृती दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाले असून अर्ज समाज विकास विभागाकडे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत उपलब्ध आहेत. जनरल, व्हेज आणि नॉन-व्हेज अशा तीन प्रकारांत स्टॉल वाटप करण्यात येणार (Pavanathadi Jatra 2026)आहे.

सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे :

बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र

संबंधित महिलेचे आधार कार्ड

बँक पासबुकची प्रत

फोटो

दि. १० ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे २,५०० अर्ज महिला बचत गट, मा. खासदार, मा. आमदार व मा. नगरसेवक यांच्याकडे वितरित करण्यात आले असून त्यापैकी १६८ अर्ज समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले आहेत. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख दि. १८ फेब्रुवारी २०२६ (Pavanathadi Jatra 2026)आहे.

‘पवनाथडी जत्रा’मुळे महिला बचत गटांना त्यांच्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून अधिकाधिक महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ मिळणार आहे, असे महापौर रवि लांडगे यांनी (Pavanathadi Jatra 2026)सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00