Home महाराष्ट्र Morwadi Society Dispute:मोरवाडीतील सोसायटी वाद प्रकरण; कुटुंबाने शेजाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Morwadi Society Dispute:मोरवाडीतील सोसायटी वाद प्रकरण; कुटुंबाने शेजाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडी येथील रेणुका गुलमोहर सोसायटीतील वाद प्रकरणात एका कुटुंबाने शेजाऱ्यांविरोधात मानसिक छळ, शिवीगाळ आणि मारहाणीचे आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : मोरवाडी येथील रेणुका गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या कदम कुटुंबाविरोधात मानसिक छळ, शिवीगाळ, मारहाण आणि दडपशाहीचे आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली (Morwadi Society Dispute) आहे.

 

तक्रारीनुसार, 10 जून रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात झालेल्या वादादरम्यान संबंधित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली तसेच तिच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून सार्वजनिकरित्या बदनामी करण्यात आल्याचा आरोप आहे. याचवेळी त्यांच्या अल्पवयीन मुलास धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले (Morwadi Society Dispute)आहे.

 

घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जबाब देण्यास तयार असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. यापूर्वीही संबंधितांविरोधात अदखलपात्र तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले (Morwadi Society Dispute)आहे.

 

संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत तक्रारदारांनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली (Morwadi Society Dispute)आहे.

 

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित आरोपींची बाजू आणि पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली (Morwadi Society Dispute)नाही.

 

टीप : प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे वृत्तात तक्रारदारांचा दावा म्हणूनच बाबींचा उल्लेख करण्यात आला (Morwadi Society Dispute)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00