22
निगडी : निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर शिवराज रामचंद्र म्हेत्रे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
डॉक्टर म्हेत्रे हे वीरशैव लिंगायत माळी समाज संघाचे माजी उपाध्यक्ष होते. तसेच प्राधिकरणातील दुर्गेश्वर हास्य क्लबचे संस्थापक व माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्य केले.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आदर्श पिता, आदर्श समाजसेवक यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि ज्येष्ठ नागरिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर शुभांगी, मुलगा डॉक्टर अमित राज, विवाहित मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
