Home क्रीडा Jr Woman Hockey Championship :हॉकी कनिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धा : हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश उपांत्य फेरीत

Jr Woman Hockey Championship :हॉकी कनिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धा : हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश उपांत्य फेरीत

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

by Admin
Spread the love

(पुणे, २० ऑगस्ट ): १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये हॉकी झारखंड, हॉकी मध्य प्रदेश, हॉकी हरियाणा आणि छत्तीसगड हॉकी यांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये या संघांनी दमदार विजय नोंदवले.

 

हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात केली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. राजणी केरकेट्टाने झारखंडसाठी गोल केला.

 

हॉकी मध्य प्रदेशने मणिपूर हॉकीचा ३-१ असा पराभव केला. काजलने दोन, तर तन्वीने एक गोल केला. मणिपूरकडून चानू रोमिता वारिबाम हिने एकमेव गोल केला.

 

हॉकी हरियाणाने हॉकी चंदीगडवर ३-१ असा विजय मिळवला. दुर्गा, दीक्षा आणि सुखप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला. छत्तीसगड हॉकीने उत्तर प्रदेश हॉकीचा ५-२ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. यशोदाने दोन, तर रुखमणी, अंजली एक्का आणि यादव शीतल यांनी प्रत्येकी एक गोल केला.

 

शुक्रवारी उपांत्य फेरीत हॉकी झारखंडची लढत हॉकी मध्य प्रदेशशी, तर हॉकी हरियाणाचा सामना छत्तीसगड हॉकीशी होणार आहे.

 

ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हॉकी महाराष्ट्रातर्फे आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00