Home गुन्हे Kudalwadi Stone Pelting:कुदळवाडीत निष्कासन कारवाईदरम्यान दगडफेक; ३३ जणांसह तीन अल्पवयीनांविरोधात गुन्हा

Kudalwadi Stone Pelting:कुदळवाडीत निष्कासन कारवाईदरम्यान दगडफेक; ३३ जणांसह तीन अल्पवयीनांविरोधात गुन्हा

कुदळवाडीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक. ३३ जणांसह तीन अल्पवयीनांविरोधात गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू असलेल्या निष्कासन कारवाईदरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी ३३ जणांसह तीन विधीसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल केला (Kudalwadi Stone Pelting)आहे.

 

या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाजीम नईम चौधरी, इजाज वकार चौधरी यांच्यासह ३३ जणांची नावे गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहेत. आरोपींपैकी नाजीम चौधरी आणि इजाज चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Kudalwadi Stone Pelting)आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत मंदिर, मशीद आणि इतर धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई सुरू होती. त्यावेळी किंग काटा परिसरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ मोठ्या संख्येने जमाव जमा झाला. कारवाईला विरोध करत काही जणांनी पोलिसांवर दगडफेक (Kudalwadi Stone Pelting)केली.

 

या दगडफेकीत बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. तसेच सरकारी वाहनांसह इतर वाहनांचेही नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू (Kudalwadi Stone Pelting)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00