पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने निगडी परिसरात मोठी कारवाई करत रासायनिक पदार्थांचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या विषारी ताडीच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ४०० लिटर भेसळयुक्त ताडी जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली (Crime Branch Action) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अवैध दारू, भेसळयुक्त मद्य आणि बेकायदेशीर ताडी निर्मितीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत निगडीतील ट्रान्सपोर्टनगर परिसरात क्लोरल हायड्रेट या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम व विषारी ताडी तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी पथकाला मिळाली(Crime Branch Action) होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त कारवाई केली. छाप्यामध्ये ४०० लिटर रासायनिक भेसळयुक्त ताडी तसेच ताडी निर्मितीसाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात (Crime Branch Action)आले.
प्राथमिक तपासात ही ताडी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे समोर आले आहे. अशा ताडीच्या सेवनामुळे गंभीर शारीरिक दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी(Crime Branch Action) सांगितले.
या प्रकरणी मौनेश यंकप्पा गुत्तेदार (वय २४) आणि लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे (वय २६) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू (Crime Branch Action)आहे.
पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करत (Crime Branch Action)आहेत.
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले (Crime Branch Action)आहे.
