Home माझं पिंपरी चिंचवड Chakan Traffic: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Chakan Traffic: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, खड्डे, अनधिकृत पार्किंग आणि जड वाहनांच्या वर्दळीवर उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना निर्देश

by Admin
Spread the love

(चाकण ): चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, खड्डे, अनधिकृत वाहनतळ आणि जड वाहनांची वर्दळ यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी (Chakan Traffic)दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एनएचएआय, वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित(Chakan Traffic) होते.

 

चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरी परिसरातील जोडरस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून प्रलंबित रस्ते कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रमुख चौकांचे सर्वेक्षण करून पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वाहतूक बेटे आणि सुरक्षित वळणमार्गांचा तांत्रिक अभ्यास केला जाणार (Chakan Traffic)आहे.

 

वाहतूक नियंत्रणासाठी एआय आधारित कॅमेऱ्यांचा वापर करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, पोलिसांना फिरते कॅमेरेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनधिकृत वाहनतळांवर टोईंग, दंड व गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार (Chakan Traffic)आहे.

 

चाकण-शिक्रापूर मार्गावरील कामांपूर्वी वाहतूक नियोजन करून जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग आणि हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कामाच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर आधी दिशादर्शक फलक लावणे बंधनकारक करण्यात येणार (Chakan Traffic)आहे.

 

अतिक्रमणे हटवल्यानंतर रस्त्यावरील विद्युत खांब व तारा हलविण्याचे काम एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआयने समन्वयाने तातडीने पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट (Chakan Traffic)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00