Home गुन्हे Tathwade Rape Case:ताथवडे अत्याचारप्रकरणी उद्या जनआक्रोश रॅली; पीडितेला न्याय मिळावा, नागरिकांना सहभागाचे आवाहन

Tathwade Rape Case:ताथवडे अत्याचारप्रकरणी उद्या जनआक्रोश रॅली; पीडितेला न्याय मिळावा, नागरिकांना सहभागाचे आवाहन

ताथवडे येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणाच्या निषेधार्थ २९ जुलै रोजी जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी : ताथवडे परिसरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणाच्या निषेधार्थ तसेच पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी बुधवारी (दि. २९ जुलै) शांततापूर्ण जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले (Tathwade Rape Case)आहे.

आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनानुसार, या प्रकरणातील आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करून न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी रॅलीद्वारे करण्यात येणार (Tathwade Rape Case)आहे.

ही रॅली बुधवारी सकाळी ९ वाजता ताथवडे येथील नृसिंह चौकातून सुरू होऊन डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाप्त होणार (Tathwade Rape Case)आहे.

बालकांवरील अत्याचाराविरोधात समाजाने एकजूट दाखवत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने शांततापूर्ण रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Tathwade Rape Case)आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00