Home प्रेरणा / यशकथा Madhukar Pawale:मला पुण्यात भेटलेली माणसातली देवमाणसे : स्व. मधुकर रामचंद्र पवळे यांची अविस्मरणीय आठवण

Madhukar Pawale:मला पुण्यात भेटलेली माणसातली देवमाणसे : स्व. मधुकर रामचंद्र पवळे यांची अविस्मरणीय आठवण

निगडीतील माजी महापौर स्व. मधुकर रामचंद्र पवळे यांच्याशी जुळलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांची माणुसकी, साधेपणा आणि निरपेक्ष प्रेम उलगडणारा विवेक कुलकर्णी यांचा भावस्पर्शी लेख.

by Admin
Spread the love

निगडी हे गाव माझ्यासाठी सर्वार्थाने भाग्याचे ठरले. इथेच माझ्या आयुष्याला स्थैर्य लाभले, कीर्ती मिळाली, जिवाभावाचे मित्र मिळाले. पण ही परिस्थिती १९९७ साली नव्हती. मी एकदम नवखा होतो. तसं नात्याचं इथं कुणी नव्हतं, ओळखपाळखही नव्हती. पण म्हणतात ना, ज्याचे कोणी नाही त्याचा देव (Madhukar Pawale)असतो.

 

मला देव कधी भेटला नाही; पण देवासारखी अनंत माणसे मिळाली. आई-वडिलांची पुण्याई आहे यामागे, हे सांगण्यात मला कसलीही मोठाईकी दाखवायची नाही. मी अतिशय विनम्रपणे सत्य कबूल (Madhukar Pawale)करतोय.

 

तर मी ९७ सालची गोष्ट सांगत होतो. निगडी येथील बी. जी. कॉर्नर या व्यापारी संकुलात दुकान तर मिळाले. अतिशय मोक्याची जागा होती ती. दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी कोणाला बोलवायचे, हा विषय डोक्यात होता. तेव्हा एक जणाने सुचवले – मा. मधुकर अण्णा (Madhukar Pawale)पवळे.

 

खरे तर तेव्हा अण्णांशी माझी काहीच ओळख नव्हती. पण ते माजी उपमहापौर होते हे ऐकिवात होते आणि शिवाय वारकरी संप्रदायातीलही होते. कसलीही ओळख नसताना मी त्यांच्या निगडी येथील घरी गेलो. मामी (सुमनताई पवळे) तेव्हा बाहेर काम करत उभ्या होत्या. मी त्यांना विचारले आणि आत प्रवेश(Madhukar Pawale) केला.

 

मला अजूनही लक्ख आठवतंय. अण्णा लुंगी आणि बनियनवर सोफ्यावर बसले होते. समोर पेपर होता. मी डायरेक्ट नमस्कार केला.

 

अण्णांनी विचारलं,

“कोण रे तू? तुला याआधी पाहिल्यासारखं तर वाटत नाही.”

 

मी म्हणालो,

“हो अण्णा, आपण आजच भेटतो आहोत. मी विवेक दिगंबरराव कुलकर्णी. बीडचा आहे. इथे मेडिकलचे दुकान टाकतोय. माझी इच्छा आहे की तुम्ही मुख्य पाहुणे म्हणून यावे आणि माझ्या दुकानाचे उद्घाटन (Madhukar Pawale)करावे.”

 

खरं सांगायचं तर त्या घरात शिरताना माझ्या मनात प्रचंड धाक होता. मी एक सर्वसामान्य गावाकडचा मुलगा आणि समोर शहरातील मोठा नेता. ते भेटतील का? बोलतील का? आपलं निमंत्रण स्वीकारतील का? असे अनेक प्रश्न मनात होते. पण पुढच्या काही मिनिटांत त्यांनी माझ्या मनातली सगळी भीती आणि अंतर कायमचं दूर करून (Madhukar Pawale)टाकलं.

 

अण्णा हसत म्हणाले,

 

“अरे पोरा, पापात टाकलंस की रे तू मला. कुलकर्णी म्हंल्यावर बामण तू, अन तू तर पायाबी पडलास की रे!”

 

मी म्हणालो,

 

“अण्णा, मोठ्यांच्या पाया पडणे पाप कसं हो? नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा म्हणतात ना? मला तर तुम्ही आशीर्वादच देणार ना. मग आशीर्वाद देणे पाप (Madhukar Pawale)कसं?”

 

अतिशय मोकळेपणाने हसत अण्णा म्हणाले,

 

“लय हुशार बाबा तू. जोशी कुलकर्णी बोलायला कुणाला ऐकतेत व्हय?”

 

आणि पुढच्याच क्षणी जे घडलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

 

अण्णा उठले आणि चक्क माझ्या पाया पडले.

 

मी अक्षरशः बावरून गेलो.

 

खरं तर मी खेडेगावातील. मोठी मोठी वयस्कर मंडळीही ब्राह्मणांच्या पाया पडतात हे मला ज्ञात होते. मी अनुभवलेही होते. गावी पोथी वाचायचो तेव्हा आईच्या वयाच्या महिला पाया पडून दक्षिणा द्यायच्या. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन (Madhukar Pawale)नव्हता.

 

पण पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर मला तोच मान देतात, हे चित्र माझ्यासाठी अविश्वसनीय(Madhukar Pawale) होते.

 

त्या क्षणी मला वारकरी संप्रदाय किती महान आहे याची प्रचिती आली. पद, पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षा माणुसकी मोठी असते, हे अण्णांनी एका कृतीतून शिकवले. आजही तो प्रसंग आठवला की डोळे नकळत (Madhukar Pawale)ओलावतात.

 

अशी आमची पहिली भेट.

 

शब्द घेऊनच मी तिथून चहा आणि श्रीफळ घेऊन परतलो. पण मनात अण्णांबद्दल एक आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते (Madhukar Pawale)जोडूनच.

 

अण्णा स्वतःहून दुसऱ्या दिवशी दुकानात आले. गप्पा मारल्या. भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांच्याशी नकळत जे नाते जोडले गेले ते शेवटपर्यंत तसेच (Madhukar Pawale)राहिले.

 

अण्णा तेव्हा बजरंग मित्र मंडळाचे सर्वेसर्वा होते. त्यानंतर लगेच गणपती होते. काही दिवसांनी अण्णा स्वतः वर्गणीसाठी प्रत्येक दुकानात जायचे. पण कुणालाही सक्ती नसायची. ऐच्छिक वर्गणी (Madhukar Pawale)असायची.

 

माझे पहिलेच वर्ष होते.

 

एका कार्यकर्त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. त्याने वर्गणीचा आकडा लिहिला. मी पावतीकडे बघत होतो. तेवढ्यात अण्णा म्हणाले,

 

“ए, कितीची पावती फाडली रे?”

 

तो मुलगा म्हणाला,

 

“अण्णा, जी आपण इतरांकडून घेतली ती.”

 

अण्णा लगेच म्हणाले,

 

“येडा हाईस का? आरे हे पोर नवीन आहे. आपल्या कडे पोट भरायला आलंय. त्याचं हे पहिलंच वर्ष. कमी कर त्याची वर्गणी.”

 

मी म्हणालो,

 

“असू द्या अण्णा, देतो मी.”

 

अण्णा म्हणाले,

 

“देशीलच रे. पण यावर्षी एकशेएक दे. पुढच्यावर्षी बघू. आधी धंदा तर कर.”

 

त्या दिवशी मला जाणवलं की अण्णांसाठी मी केवळ वर्गणीदार नव्हतो. मी त्यांच्या परिसरात आलेला एक नवीन मुलगा होतो, ज्याने इथे आपलं आयुष्य उभं करायचं(Madhukar Pawale) होतं.

 

अण्णा मला कधीच विवेक म्हणाले नाहीत. “सेठ” तर कधीच नाही.

 

ते मला कायम “पोरा” म्हणायचे.

 

आज इतकी वर्षे झाली, अनेक लोक भेटले, अनेकांनी आदराने नाव घेतलं, काहींनी “सेठ” म्हटलं; पण अण्णांच्या तोंडून निघणाऱ्या त्या “ए पोरा” या दोन शब्दांत जी माया, जिव्हाळा, आपलेपणा आणि आशीर्वाद होता, तो पुन्हा कधी कुणाच्या शब्दांत सापडला नाही.

 

ते नेहमी विचारायचे,

 

“तुला काही अडचण? काही गरज?”

 

देवदयेने दुकान अतिशय उत्तम चालत होते. त्यामुळे अडचणी नव्हत्या. पण अण्णा आहेत, ही भावना मोठा आधार(Madhukar Pawale) होती.

 

कधी काही अडचण आली तर अण्णांकडे जावे, हा विश्वास पुरेसा होता. त्यांनी मदत केली किंवा नाही हा मुद्दा नव्हता. त्यांच्या अस्तित्वानेच धीर(Madhukar Pawale) मिळायचा.

 

मी नेहमी म्हणायचो,

 

“अण्णा, पुढच्या टर्मला तुम्ही महापौर. लाल दिवा आपल्या घरी.”

 

अण्णा फक्त हसायचे. डोळे मिटायचे. ते फारसे बोलत नसत. मितभाषी होते. पण एखादाच मुद्देसूद पॉईंट(Madhukar Pawale) बोलायचे.

 

कर्मधर्मसंयोगाने अण्णा काही दिवसांतच महापौर झाले.

 

आम्ही सर्व व्यापारी वर्ग त्यांचे अभिनंदन करायला महापालिकेत गेलो होतो. अण्णांनी सर्वांना चहा पाजला.

 

मी खूप लाजरा आहे. मागे बसलो होतो.

 

अचानक अण्णांचे लक्ष माझ्याकडे गेले.

 

“इकडे ये रे पोरा.”

 

मी जरा बिचकतच गेलो.

 

“तू का आलास?”

 

मी म्हणालो,

 

“अण्णा, तुमचं अभिनंदन करायला.”

 

“दुकानात कोण?”

 

मी याच प्रश्नाला घाबरत होतो. मी गप्प.

 

अण्णा म्हणाले,

 

“धंदा करायला आला ना? ही सेठ लोक आहेत. तू पहिला धंदा बघ. तुझ्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत. नीट पोट भर. दुकान सोडून फिरायचं नाही. मस्ती करायला आला की पोट भरायला?”

 

मी गप्पच.

 

काय बोलणार?

 

पण त्या क्षणी महापौर माझ्याशी बोलत नव्हते. माझी काळजी करणारा घरातला एखादा मोठा माणूस बोलत होता. आजही तो प्रसंग आठवला की वाटतं, माझ्या यशाची जितकी काळजी मला होती, तितकीच कदाचित अण्णांनाही (Madhukar Pawale)होती.

 

पण…

 

देव कधी कधी खूप निष्ठुर होतो म्हणतात, ते खोटं नाही.

 

सर्व काही चांगलं चालत असतानाच अण्णा अचानक आम्हा सर्वांना सोडून त्याच्याकडे निघून गेले.

 

महापौरपदावर असतानाच त्यांचे निधन झाले.

 

त्या बातमीने मी सुन्न झालो(Madhukar Pawale) होतो.

 

माझे कुणी रक्ताचे नातेवाईक गेले नव्हते, पण मनातून काहीतरी तुटल्यासारखे वाटत होते. निगडीत आल्यापासून ज्यांनी मला आधार दिला, आपले मानले, ज्यांच्या नावाने धीर यायचा, तो माणूस आता कायमचा दूर गेला (Madhukar Pawale)होता.

 

त्यांच्या अंत्ययात्रेला असलेला विशाल शोकसागर अण्णा माणूस म्हणून किती महान होते याची साक्ष देणारा होता.

 

त्या गर्दीत हजारो लोक होते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना होती — आपलं माणूस (Madhukar Pawale)गेलं.

 

कुठल्याही ओळखीविना, नात्याविना मला आपले मानणारे अण्णा माझ्या आयुष्यातील खरोखरच एक देवमाणूस(Madhukar Pawale) होते.

 

आज इतकी वर्षे उलटून गेली. आयुष्यात अनेक मोठी माणसे भेटली. अनेक पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार भेटले. पण अण्णांसारखा निरपेक्ष स्नेह, निस्वार्थ प्रेम आणि माणुसकीचा झरा पुन्हा कुठेच दिसला (Madhukar Pawale)नाही.

 

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.

 

माझ्या आयुष्यात भेटलेल्या #माणसातलीदेवमाणसे मध्ये अण्णांचे स्थान कायम सर्वात वर(Madhukar Pawale) राहील.

 

अण्णांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी (Madhukar Pawale)प्रार्थना.

 

विवेक कुलकर्णी

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00