पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित भ्रष्टाचार, मनपा मालमत्तांचे खासगीकरण आणि विविध विकासकामांतील अनियमिततेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधित निर्णय रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पत्रकार परिषदेत (Shiv Sena UBT)दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली काटकर, वैशाली कुलथे, पिंपरी उपशहर प्रमुख अमोल निकम, समन्वयक पार्थ गुरव, उपशहर प्रमुख दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित (Shiv Sena UBT)होते.
पवार यांनी पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित जागा खासगी संस्थेला भाडेकराराने देण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. या जागेवर महापालिकेने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शाळा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित जागेचे भाडे अत्यल्प दराने निश्चित करण्यात आल्याचा आरोप करत त्यामागील निकष जाहीर करण्याची मागणीही (Shiv Sena UBT)केली.
याशिवाय, मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी (Shiv Sena UBT)केली.
पवना नदीच्या प्रदूषणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. नदीपात्रात राडारोडा टाकणे, सांडपाणी सोडणे आणि नदीकाठावरील अतिक्रमणामुळे नदीची दुरवस्था होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच रावेत परिसरातील नदीकाठावर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाई करण्याची मागणी (Shiv Sena UBT)केली.
ताथवडे येथील एका बांधकाम प्रकल्पाबाबत नगररचना विभागाच्या अभिप्रायात नाला दर्शविण्यात आला असताना प्रत्यक्षात विकास आराखड्यात बदल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने संबंधित बांधकाम परवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी (Shiv Sena UBT)केली.
तसेच ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित(Shiv Sena UBT) केला.
दरम्यान, या सर्व प्रकरणांमध्ये महापालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चेतन पवार यांनी (Shiv Sena UBT)दिला
.टीप : वरील सर्व आरोप पत्रकार परिषदेत मांडण्यात आले असून संबंधित प्रकरणांबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली (Shiv Sena UBT)नाही.
