Home माझं पिंपरी चिंचवड Environmental Awareness:पथनाट्यातून गणेशमूर्तीदानाबाबत जनजागृती

Environmental Awareness:पथनाट्यातून गणेशमूर्तीदानाबाबत जनजागृती

पिंपळे गुरव नदीघाटावर पथनाट्यातून गणेशमूर्तीदान व पर्यावरण संवर्धनाचा संदेश. आतापर्यंत १,५०० गणेशमूर्तींचे संकलन; नागरिकांना पर्यावरणाची शपथ.

by Admin
Spread the love

(पिंपळे गुरव) : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदीघाटावर गणेशमूर्तीदान व पर्यावरण संवर्धनाबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदीघाटांवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौदांची व्यवस्था केली असून, नागरिकांनी नदीऐवजी याच ठिकाणी मूर्ती विसर्जित कराव्यात, तसेच निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कुंडीत जमा करावे, असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.

 

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, प्रकाश घोरपडे, बालकलाकार काव्या घोरपडे आणि क्रांती घोरपडे यांनी पथनाट्यात सहभाग घेतला.

 

अण्णा जोगदंड म्हणाले, “गणेशमूर्तीदान किंवा हौदात विसर्जन केल्याने नदी प्रदूषण निश्चितच कमी होण्यास मदत होईल. काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक आहे. गणेशमूर्तींचा पुनर्वापर व्हावा आणि पर्यावरणाचे नुकसान टाळता यावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पालिकेसोबत दोन्ही संस्था पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.”

 

सुरेश कंक म्हणाले, “ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले पाहिजे. शहरातील नागरिक नदीचे पाणी वापरतात, त्यामुळे नदी स्वच्छ व निर्मळ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मूर्तीदानाचे महत्त्व सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.”

 

पिंपळे गुरव घाटावर आतापर्यंत सुमारे १,५०० गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये ४०० शाडूच्या आणि १,१०० पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था तसेच बेसिक टीमने मूर्ती संकलनात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.

 

महापालिकेच्या ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. महापालिकेच्या विविध उपक्रमांत यापुढेही त्यांना सहभागी करून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी राजू साबळे, अण्णा जोगदंड, सुरेश कंक, संगीता जोगदंड, प्रकाश घोरपडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, बेसिक टीमचे झोनल प्रमुख सुखदेव लोखंडे, सागर पाटील, शिवाजी निम्हण, विजय पेंडे, दीपक चौरे, काव्या घोरपडे आणि क्रांती घोरपडे उपस्थित होते. श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती करून मूर्तिदान करण्यात आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00