Home गुन्हे Pimpri Camp Tree Cutting: पिंपरी कॅम्पमध्ये दिवसाढवळ्या झाडाची मुळासकट तोड; कारवाईची मागणी

Pimpri Camp Tree Cutting: पिंपरी कॅम्पमध्ये दिवसाढवळ्या झाडाची मुळासकट तोड; कारवाईची मागणी

पिंपरी कॅम्पमधील वैष्णवी माता मंदिर रोडवर जुने मोठे झाड जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उखडल्याचा प्रकार; दोषींवर कारवाईची मागणी.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाकडून वृक्षलागवडीचा संदेश दिला जात असतानाच पिंपरी कॅम्प परिसरात मुख्य रस्त्यावरील जुने मोठे झाड जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उखडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (७ सप्टेंबर) दुपारी सव्वादोनच्या सुमारास वैष्णवी माता मंदिर रोड, एच. बी. ब्लॉक-३, गणपती मंदिराच्या पाठीमागे ही घटना (Pimpri Camp Tree Cutting)घडली.

 

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांना माहिती दिली. कुदळे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता झाड मुळासकट उखडून टाकल्याचे तसेच त्याचे लाकूड व अवशेष पिकअप टेम्पोमधून नेण्यात आल्याचे(Pimpri Camp Tree Cutting) आढळले.

 

झाड उखडण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीवर आरटीओ नंबर प्लेट नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणले. या घटनेचे फोटो व अन्य पुरावे नागरिकांनी जमा केले (Pimpri Camp Tree Cutting)आहेत.

 

या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियमांतर्गत संबंधित व्यक्ती, जेसीबी चालक आणि अन्य दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुहास कुदळे व स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी महापालिकेचा उद्यान विभाग काय कारवाई करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले (Pimpri Camp Tree Cutting)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00