Home क्रीडा IPL 2026 Final : गुजरात टायटन्स आज ‘क्वालिफायर वन’मध्ये; आरसीबीविरुद्ध विराटचा अनुभव की गिलचा युवा जोश?

IPL 2026 Final : गुजरात टायटन्स आज ‘क्वालिफायर वन’मध्ये; आरसीबीविरुद्ध विराटचा अनुभव की गिलचा युवा जोश?

विजेत्या संघाची थेट अंतिम फेरीत एन्ट्री; पराभूत संघाला मिळणार आणखी एक संधी

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2026 च्या प्लेऑफला आजपासून सुरुवात होत असून पहिल्याच ‘क्वालिफायर-१’ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार (IPL 2026, GT vs RCB) आहे.

 

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. फलंदाजीमध्ये गिल, सुदर्शन आणि जोस बटलर यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज, राशिद खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकले आहे. विशेष म्हणजे सिराजचा हा सामना माजी संघ आरसीबीविरुद्ध असल्याने त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले (IPL 2026, GT vs RCB)आहे.

 

दुसरीकडे, विराट कोहलीच्या अनुभवाच्या जोरावर बंगळुरू संघाने अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये शानदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये धडक मारली. विराटसोबत फिल सॉल्ट, रजत पाटीदार आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजीत जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा (IPL 2026, GT vs RCB)आहेत.

 

दोन्ही संघांनी साखळी फेरीत प्रत्येकी १४ सामने खेळताना ९ विजय मिळवले. मात्र नेट रनरेटमध्ये गुजरात आघाडीवर राहिल्याने त्यांना पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले. आजच्या सामन्यात विराट कोहलीचा अनुभव वरचढ ठरणार की शुभमन गिलचा युवा जोश बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले(IPL 2026, GT vs RCB) आहे.

 

दरम्यान, पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार असून त्यांना ‘क्वालिफायर-२’ खेळावा लागणार(IPL 2026, GT vs RCB) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00