Home आरोग्य Vithal Ambu Zodge :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल अंबू झोडगे यांचे निधन

Vithal Ambu Zodge :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल अंबू झोडगे यांचे निधन

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे चिंचवड परिसरातील जेष्ठ आधारवड काळाच्या पडद्याआड

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. ५ : चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणप्रेमी विठ्ठल अंबू झोडगे (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत(Vithal Ambu Zodge) आहे.

 

विठ्ठल झोडगे यांनी आयुष्यभर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पाबळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच महात्मा फुले मंडळ, पिंपरी-चिंचवड येथे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका (Vithal Ambu Zodge)बजावली.

 

व्यावसायिक जीवनात त्यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत चेअरमन क्लब मेंबर हा मान मिळविला (Vithal Ambu Zodge)होता.

 

मनमिळावू, मितभाषी आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी समाजात वेगळा ठसा (Vithal Ambu Zodge)उमटविला.

 

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, चार मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा परिवार असा आप्तपरिवार(Vithal Ambu Zodge) आहे.

 

त्यांच्या निधनाने चिंचवड परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत (Vithal Ambu Zodge)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00