Home तंत्रज्ञान MLA Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवडला लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा मास्टर प्लॅन

MLA Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवडला लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा मास्टर प्लॅन

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज परिमंडळ, नवीन उपकेंद्रे, डीपीआर आणि प्रलंबित वीज प्रकल्पांना गती देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी महावितरण व महापारेषण अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शहराची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ येथे झालेल्या बैठकीत प्रलंबित वीज प्रकल्पांना गती देणे, कालबद्ध नियोजन करणे आणि शहराला टप्प्याटप्प्याने लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी व्यापक आराखडा निश्चित करण्यात (MLA Shankar Jagtap)आला.

बैठकीत पिंपरी-चिंचवड, राजगुरुनगर आणि लोणावळा या भागांसाठी स्वतंत्र वीज परिमंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच मतदारसंघनिहाय वीज वितरण सनियंत्रण समित्या स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढील सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सुरू करणे, यशदा परिसरात नवीन उपकेंद्रासाठी जागेचा प्रस्ताव मार्गी लावणे आणि सन २०५१ पर्यंतच्या गरजांचा विचार करून नवीन वीज उपकेंद्रे व सबस्टेशनसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गहुंजे येथे प्रस्तावित २२०/२२ केव्ही, ३०० एमव्हीए अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रस्तावालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रावेत, पुनावळे, किवळे, ताथवडे, सांगवी आणि नवी सांगवीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या व पूरप्रवण भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर, डीपी, केबल आणि आरएमयू यांसारख्या सुविधांचे नियोजन, संरक्षण आणि आवश्यक तेथे स्थलांतर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात (MLA Shankar Jagtap)आला.

या बैठकीस महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल भारसाकळे, अधीक्षक अभियंते व्ही. डी. भुजबळ, जे. एम. कोकाटे, पी. एच. काकडे यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीजयंत्रणेची क्षमता वाढवणे, नवीन उपकेंद्रे उभारणे आणि प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. महावितरण, महापारेषण, पीसीएमसी आणि पीएमआरडीए यांच्या समन्वयातून पिंपरी-चिंचवडला पूर्णपणे लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात येत(MLA Shankar Jagtap) आहे.”

https://youtu.be/sLSHNSad9Os?si=lzoW-7B0ZEcU_DST


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00