(पिंपरी, प्रतिनिधी, 3 सप्टेंबर 2026): नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून जलदगतीने निराकरण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समीर लॉन्स येथे झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील ७१५ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात (MLA Shankar Jagtap)आल्या.
या वेळी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, तहसीलदार जयराज देशमुख, उपायुक्त राजेश आगळे, नायब तहसीलदार रवींद्र कुलकर्णी, अन्नधान्य वितरण अधिकारी डॉ. विजयकुमार क्षीरसागर, ‘ज’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, मनपाचे कार्यकारी अभियंते सुनील पवार व सुनील शिंदे, महावितरणचे अधिकारी रत्नदीप काळे व नितीन महाजन, सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली शिंदे, रावेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लिंभोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित(MLA Shankar Jagtap) होते.
रावेतमधील वाहतूककोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टीने फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खासगी तसेच महापालिकेच्या जागेवरील आठवडे बाजारांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात (MLA Shankar Jagtap)आले.
किवळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान विकसित करणे, सेवा रस्त्यांचे डांबरीकरण, स्ट्रीट लाईट सुरू करणे, डीपीमधील रस्ते विकसित करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच एमएसईबीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागण्या नागरिकांनी मांडल्या. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या जड वाहनांवर कारवाई, घंटागाडी नियमित करणे आणि कचरा संकलन केंद्राशी संबंधित समस्यांबाबतही नागरिकांनी तक्रारी (MLA Shankar Jagtap)केल्या.
या उपक्रमात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीज, वाहतूक, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित तक्रारींची नोंद करण्यात आली. आरोग्य, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, करसंकलन, नगररचना, बांधकाम परवानगी, विद्युत व पर्यावरण विभागांचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले होते. तसेच तहसील, तलाठी, रेशनकार्ड, एमएनजीएल, महावितरण आणि एनएचएआयचे अधिकारीही उपस्थित (MLA Shankar Jagtap)होते.
तातडीने सोडविता येणाऱ्या प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक असलेल्या प्रकरणांचा कालबद्ध पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना(MLA Shankar Jagtap) दिले.
“नागरिकांनी आपल्या प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत, यासाठी थेट नागरिकांपर्यंत जाण्याचा माझा हा प्रयत्न आहे. रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले असून, प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याचा सातत्याने आणि कालबद्ध पद्धतीने पाठपुरावा केला जाईल. स्थानिक प्रश्नांसोबतच शासनस्तरावर प्रलंबित विषयांवरही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठोस कार्यवाही केली जाईल,” असे आमदार शंकर जगताप यांनी (MLA Shankar Jagtap)सांगितले.
एकाच ठिकाणी विविध विभागांचे अधिकारी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता आपल्या समस्या थेट मांडता आल्या. त्यामुळे ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद(MLA Shankar Jagtap) मिळाला.



