Home माझं पिंपरी चिंचवड MLA Shankar Jagtap:नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; जनसेवेला नवी दिशा

MLA Shankar Jagtap:नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; जनसेवेला नवी दिशा

नवी सांगवी येथे नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नागरिकांच्या समस्या सोडविणे, जनसंपर्क आणि विकासकामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

by Admin
Spread the love

नवी सांगवी : प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांच्या नव्या सेवा व संवाद कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. २८) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी जनसंपर्क आणि प्रशासनाशी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार (MLA Shankar Jagtap) आहे.

 

चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते फीत कापून आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय मराठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात (MLA Shankar Jagtap)आला.

उद्घाटनानंतर आमदार शंकर जगताप आणि नगरसेविका पल्लवी जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विकासकामे आणि लोकसेवा अधिक वेगाने करण्याचा निर्धार व्यक्त (MLA Shankar Jagtap) केला.

 

या सोहळ्यास राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. नव्या सेवा व संवाद कार्यालयामुळे नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडविण्यास मदत होईल आणि विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त (MLA Shankar Jagtap) केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00