Home क्रीडा AVC Men’s Volleyball:भारताचे एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कप २०२६ मध्ये ऐतिहासिक कांस्यपदक; इंडोनेशिया ठरला नवा आशियाई विजेता

AVC Men’s Volleyball:भारताचे एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कप २०२६ मध्ये ऐतिहासिक कांस्यपदक; इंडोनेशिया ठरला नवा आशियाई विजेता

एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कप २०२६ स्पर्धेत भारताने बहरीनचा ३-१ असा पराभव करून इतिहासातील पहिले कांस्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात इंडोनेशियाने दक्षिण कोरियावर ३-० असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

by Admin
Spread the love

ऐतिहासिक कामगिरी! भारताचे एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कपमध्ये पहिले कांस्यपदक; इंडोनेशियाचा दक्षिण कोरियावर विजय, जेतेपदावर नाव

अहमदाबाद, दि. २९ : भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कप २०२६ स्पर्धेत इतिहास रचत प्रथमच कांस्यपदक पटकावले. तिसऱ्या स्थानाच्या लढतीत गतविजेत्या बहरीनचा ३-१ (२५-२३, २३-२५, २५-२१, २५-१७) असा पराभव करून भारताने आशियाई व्हॉलीबॉलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद  (AVC Men’s Volleyball) केली. 

 

उपांत्य फेरीत इंडोनेशियाकडून २-३ अशा चुरशीच्या पराभवानंतर भारतीय संघाने निराशा झटकत कांस्यपदकाच्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. पहिला सेट जिंकल्यानंतर बहरीनने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमक स्मॅश, अचूक ब्लॉकिंग आणि प्रभावी बचावाच्या जोरावर सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत विजय निश्चित(AVC Men’s Volleyball) केला.

 

भारतासाठी हे पदक विशेष महत्त्वाचे ठरले आहे. कारण या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक जिंकण्याचा मान मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने न्यूझीलंड, कझाकस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बहरीनसारख्या मजबूत संघांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत इंडोनेशियाविरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव झाला, मात्र कांस्यपदकाच्या सामन्यात संघाने मानसिक ताकद दाखवत ऐतिहासिक विजय (AVC Men’s Volleyball) मिळवला.

 

इंडोनेशियाचा ऐतिहासिक किताब

 

अंतिम सामन्यात इंडोनेशियाने आशियातील बलाढ्य दक्षिण कोरियावर सरळ ३-० (३४-३२, २५-१६, २५-२३) असा विजय मिळवत प्रथमच एव्हीसी मेन्स व्हॉलीबॉल कपचे जेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. ३४-३२ असा सेट जिंकल्यानंतर इंडोनेशियाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुढील दोन्ही सेटमध्ये दक्षिण कोरियाला पुनरागमनाची संधीच दिली(AVC Men’s Volleyball) नाही.

 

या विजयासह इंडोनेशियाने आशियाई व्हॉलीबॉलमध्ये नवे पर्व सुरू केल्याचे मानले जात आहे. अंतिम फेरीपर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे दर्शन (AVC Men’s Volleyball) घडवले.

 

भारतीय संघासाठीही ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. आशियाई व्हॉलीबॉलमध्ये भारताची ताकद पुन्हा अधोरेखित झाली असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी हा ऐतिहासिक कांस्यपदक विजय मोठा आत्मविश्वास देणारा(AVC Men’s Volleyball) ठरेल.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00