चिंचवड, दि. ७ : चिंचवड येथील प्रतिभा वाणिज्य आणि संगणक अध्ययन महाविद्यालयाने सायबर सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या सायबर क्लबने उत्कृष्ट कामगिरी करत “सर्वोत्कृष्ट सर्वंकष (ओव्हरऑल) सायबर क्लब” गटात द्वितीय उपविजेतेपद(Pratibha Educational Institute ) पटकावले.
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत विविध राज्यांतील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर क्लबने सातत्यपूर्ण प्रयत्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजात सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या कार्यामुळे विशेष स्थान (Pratibha Educational Institute )मिळवले.
पुणे येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आणि महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत सायबर सुरक्षेत तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित (Pratibha Educational Institute )केले.
या कार्यक्रमास प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या क्षितिजा गांधी, शिक्षक समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी, तसेच सायबर क्लबचे पदाधिकारी उपस्थित(Pratibha Educational Institute ) होते.
स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावरही यश मिळवले. आकाश ठाकूर यांनी “सर्वोत्कृष्ट सचिव” या विभागात प्रथम उपविजेतेपद मिळवले. स्नेहा तेली आणि साकीब चौधरी यांना “सर्वोत्कृष्ट सायबर योद्धा संघ” पुरस्कार मिळाला. श्रावणी सावंत यांना “सर्वोत्कृष्ट कामगिरी (अध्यक्षा)” सन्मान मिळाला, तर मानसी वाडेकर यांना “सर्वोत्कृष्ट माध्यम संचालक” विभागात नामांकन प्राप्त झाले. तसेच डॉ. हर्षिता वाच्छानी यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षक समन्वयक” विभागात नामांकन (Pratibha Educational Institute )मिळाले.
महाविद्यालयाच्या सायबर क्लबने स्पर्धेपलीकडे जाऊन समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन आणि सायबर साक्षरता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. याच सातत्यपूर्ण कार्यामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन करता आले(Pratibha Educational Institute ) आहे.
या यशानिमित्त आयोजित कौतुक सोहळ्यात डॉ. दीपक शहा म्हणाले की, या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक मोठे योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “सायबर सुरक्षित भारत घडविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी (Pratibha Educational Institute )सांगितले.
यावेळी संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित (Pratibha Educational Institute ) होते.
